उद्देश

स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
प्रधानमंत्री / रमाई / शबरी घरकुल योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे.
म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत पांधन रस्ते,शेततळे,सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिर, वृक्ष लागवड,शोषखड्डे व अन्य कामे करणे.
संजय गांधी / श्रावण बाळ योजनांतर्गत गावातील योजनेचे तालुका अध्यक्ष श्री चांगोजी महादेव तिजारे यांच्या परिश्रमातून १००% पात्र लाभार्थीना लाभ देणे.
प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.

यशस्वी उद्देश्यपुर्ती / पुरस्कार

निर्मल ग्राम स्वच्छता पुरस्कार २०१०-११ गावाला प्राप्त.संपूर्ण हागणदारी मुक्त ग्राम केल्याबद्दल चिरव्हा ग्रामला पुरस्कार प्राप्त
म.गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त ग्राम.
पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना विशेष पुरस्कारप्राप्त ग्राम.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षात तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त ग्रामपंचायत.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्राम अभियानातील कुटुंब कल्याणांतर्गत २०१२-१३ या वर्षात जिल्हास्तरीय सर्वात उत्कृष्ठ कामगिरी बजाविल्याबद्दल विशेष पुरस्कारप्राप्त ग्राम.
२०१७-१८ या वर्षात "स्मार्ट सिटी " योजनेअंतर्गत तालुका स्तरीय प्रथम पारितोषिक
चंदेरी प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायत. २०१७-२०१८
ISO प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायत.
अटल पेंशन योजनेअंतर्गत चिरव्हा गावात १८ ते ४० वर्ष वयोगटातील असंगठित क्षेत्रातील सर्व बचत बैंक खाते धारकांपैकी ८६ % पेक्षा जास्त ग्राहकांनी या योजनेत लाभ घेतला आहे
चिरव्हा गावात ५० पेक्षा कमी माइक्रोनचे प्लास्टिक वापरण्यास बंदी आहे